Aditya Thackeray । “कृषीमंत्र्यांना ‘त्यांच्या’ सोबत बसायचं असतं”, आदित्य ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा
Aditya Thackeray । मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आदित्य ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर सडकून टीका केली. “शेतकऱ्यांची अवस्था वाईट असताना कृषीमंत्र्यांना वेगळा कार्यक्रम करायला जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसायचं असतं. मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप गेले नाहीत”, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी सत्तारांना लगावला आहे.
“पावसाळी अधिवेशनात पायऱ्यांवर बसून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी महाविकास आघाडीनं केली होती. पण या घटनाबाह्य सरकारनं आमचं अद्यापपर्यंत ऐकलं नसल्याचं आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील टीकास्र सोडलं आहे. “एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. महाराष्ट्र शिंदे सरकारला माफ करणार नाही” असे ठाकरे म्हणाले आहेत.
राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. याची दखल अद्याप सरकारने घेतली नसून हे दुर्देवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली. या ठिकाणी शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच आम्ही जुलै पासून आरडा ओरडा करतोय की टाटा एअर बस प्रकल्प तरी जाऊन देवू नका, तो प्रकल्प पण आज हातून गेला, अशी खंत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी व्यक्त केलीय.
दरम्यान, हे सरकार आल्यापासून राज्यातील चार प्रकल्प राज्याच्या हातून गेले असल्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातचा रोजगार निघून गेला असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे राज्यांमधील जनतेत अस्वस्थता असून राज्यातील जनतेला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे, त्यामुळे तुम्ही उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार आहात का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tea Tips | गुलाबी थंडीमध्ये निरोगी राहण्यासाठी ‘या’ चहा ने करा दिवसाची सुरुवात
- Bachhu Kadu | “असली मंत्रिपदं ओवाळून टाकतो, राजीनामा आमच्या हातात”; बच्चु कडू आक्रमक
- Aditya Thackeray | उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा ; आदित्य ठाकरे यांची मागणी
- Bachhu Kadu । “ज्याच्या घरी जेवायचं त्याच्याच घरावर…”; बच्चू कडूंचा रवी राणांवर पुन्हा निशाणा
- Homestay In Manali | मनाली ट्रिप अधिक स्वस्त बनवण्यासाठी ‘या’ होमस्टे मध्ये करा मुक्काम
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.