Aditya Thackeray । ‘या’ नेत्याच्या सभेचं कारण देत आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली; सत्तारांची पुढची खेळी काय असणार?

Aditya Thackeray । औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सिल्लोडमध्ये येऊन शिवसंवाद यात्रा घेऊन दाखवण्याचे आव्हान केले होते. हे आव्हान स्वीकारत त्यांनी सिल्लोडमधील सभेची घोषणा केली. मात्र आदित्य ठाकरे यांच्या सिल्लोडमधील सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. सिल्लोड नगर परिषदेने ही परवानगी नाकारली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात ही नगर परिषद असल्याने यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नगर परिषदेने एका बड्या नेत्याच्या सभेचं कारण दिलं आहे.

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सिल्लोडमध्ये सभा होणार असल्याची घोषणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच अब्दुल सत्तारांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या सभेची घोषणा केली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा सिल्लोडला होणार आहे.

आदित्य ठाकरे यांची सिल्लोडच्या महावीर चौकात सभा होणार आहे तर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची सभा झेडपी ग्राऊंडवर होणार आहे. झेडपी ग्राऊंड आणि महावीर चौक समोरासमोरच आहे. श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची सभा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची सभा समोरासमोर होत असल्याने नगर परिषदेने आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे.

आदित्य ठाकरे यांची सभा 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता भगवान महावीर चौकात होणार आहे. तर श्रीकांत शिंदे यांचीही सभा 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. ही सभा जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. मात्र आता आदित्य ठाकरे यांना महावीर चौका ऐवजी इतर ठिकाणी सभा घेण्याची सूचना नगर परिषदेने केली आहे. आता जर दोन्ही सभा एकाच दिवशी सिल्लोडमध्ये समोरासमोर झाल्या तर कुणाचं शक्तिप्रदर्शन जोरदार होणार आणि अब्दुल सत्तार यांची पुढची खेळी काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.