Aditya Thackeray | “आदित्य ठाकरेंच्या लग्नाची जबाबदारी घेऊ”; फडणवीसांच्या वक्तव्याने विधानसभेत पिकला हशा

Aditya Thackeray | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नेत्यांमध्ये वाद-विवाद पाहायला मिळत आहे. परंतु हे वाद आता फार काही नवे नाहीत. आता दररोज विधानसभेत टीका-टिप्पणी पाहायला मिळत असते.  विधानसभेत दादा भुसे (Dada Bhuse) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर विधानसभेत आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) विवाहाबाबत प्रश्न केला आहे. यावर फडणवीसांनी त्यावर मिश्कील भाष्य करत ‘हा प्रश्न आदित्य ठाकरेंकडे पाहून का केला?’ असा प्रतिसवाल केला आहे. या मुद्द्यावरुन विधानसभेत एकच हशा पिकला आहे.

नेमकं काय घडलं विधानसभेत? (What Happen In Assembly Hall?)

आज विधानसभेत भाकरी आणि चाकरी या विधानावरून अजित पवार आणि दादा भुसे यांच्यात खडाजंगी झाली. यावर अजित पवार यांनी शरद पवार यांच नाव काय घ्यायची गरज आहे? असा सवाल केला. यामुळे या वादावरून राजकीय वातावरण तापलं. काही वेळ निघून जाताच विधानसभेतलं तापलेलं वातावरण निवळलं. आमदार बच्चू कडू यांनी विवाहाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवाहाचा प्रश्न आदित्य ठाकरेंकडे पाहून का केला? असा मिश्कील सवाल त्यांनी केला. त्याची जबाबदारी सरकार घेईल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर आता आदित्य ठाकरेंनी देखील हसत हसत मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे? (What Did Say Aditya  Thackeray?)

देवेंद्र फडणवीस यांच्या टिप्पणीनंतर आदित्य ठाकरे यांनीही मिश्किल टिप्पणी केली. “ही काही राजकीय धमकी आहे का, आधी लग्न लावून देऊ तरच इथे बसा वगैरे.” यावर मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीही चिमटा घेतला. राहुल नार्वेकर म्हणाले की, “आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं.” यामुळे आज विधानसभेच वातावरण काही वेगळंच पाहायला मिळालं आहे. याच वक्तव्यावर देवेंद्र फडणविसांनी वक्तव्य केलं “कोणाचही तोंड बंद करायचं असेल तर लग्न हा उपाय अनुभवातून सांगतोय.” यामुळे आज विधानसभेतलं वातावरण आनंदी असल्याचे पाहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या