InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असं जनतेला वाटतं- संजय राऊत

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं राज्यातील जनतेला वाटतं, असं मोठं विधान शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisement -

एका युवा नेतृत्वाच्या हातात राज्य द्यावं असं जनतेला वाटतं असं विधान संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. अद्याप अधिकृतरित्या शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढविण्यावर कोणतंही भाष्य केलं नाही.आदित्य ठाकरे यांनीही याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं सांगून निवडणूक लढविण्याबाबत बोलणं टाळलं. आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली तर ठाकरे घराण्यातील निवडणूक लढविणारे ते पहिलेच नेते असतील. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.