आदित्य ठाकरेंनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत!

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईच्या दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. ममतांच्या दौऱ्यावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्या टीकेनंतर राऊतांनी भाजपला उत्तर देत भेटीतील चर्चेची माहिती ‘रोखठोक’मधून दिली.

”आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी त्या हॉटेलच्या लिफ्टपर्यंत चालत आल्या. तेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांना नम्रपणे थांबवले, तरीही त्या आल्या. ‘तुम्ही तरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी राहील. मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारण करीत आहे. तरुणांची शक्ती मला माहीत आहे. तुम्हीच आता पुढे यायला हवे’, असे ममता म्हणाल्या,” असे राऊतांनी रोखठोकमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान पुढे राऊत म्हणतात, ”आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील तरुण, कार्यक्षम मंत्री. मुख्यमंत्र्यांचे ते चिरंजीव आहेत. हा शिक्का त्यामुळे पुसायला हवा. ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. ‘तुमच्या कामाची मी सतत माहिती घेत असते. खूप चांगले काम तुम्ही करताय. तुमच्याकडे पर्यटन विभाग आहे. बंगाल, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत पर्यटनाची देवाणघेवाण वाढायला हवी. प. बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाकडे महाराष्ट्रातील पर्यटनाचा ओघ आहे तो वाढला पाहिजे,”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा