‘तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल’

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर शिवसेनेने तो मुद्दा रेटून धरला पाहिजे. शिवसेनेने जर असं केलं नाही तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी व्हायला वेळ लागणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. आगामी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. मात्र प्रकाश आंबेडकर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याची चर्चा आहे. याविषयी विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही. पंरतु शिवसेनेने आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा सॅक्रिफाईज करु नये एवढीच माझी विनंती. त्यांनी सॅक्रिफाईज केलं तर त्यांचा राहुल गांधी झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंसमोर एकच मार्ग की आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होऊ द्यायचं नसेल तर तो मुद्दा त्यांनी रेटला पाहिजे.”

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.