InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘एसएससी’ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तुकडी करा- आदित्य ठाकरे

- Advertisement -

‘एसएससीच्या विद्यार्थ्यांना अन्य बोर्डांतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत आणण्यासाठी अंतिम निकालात त्यांचे अंतर्गत गुणही ग्राह्य धरण्यात यावेत. तसंच, अकरावी प्रवेशात त्यांच्यासाठी स्वतंत्र तुकडी करण्यात यावी,’ अशी मागणी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली आहे.

- Advertisement -

एसएससी बोर्डानं बदललेल्या गुणांकन पद्धतीमुळं उडालेला गोंधळ व महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आदित्य यांनी काल मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतील चर्चेची माहिती आज त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अकरावी प्रवेशासाठी त्यांना सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळं त्यांची महाविद्यालय प्रवेशाची वाट बिकट बनली आहे. या संपूर्ण परिस्थितीवर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

महाविद्यालयांमध्ये एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तुकडी करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. शिक्षणमंत्र्यांना त्यांनी याबाबत विचार करण्याची सूचना केली आहे,’ असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आदित्य यांनी सांगितलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.