InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आदित्य ठाकरेंची ‘जन आशीर्वाद’ यात्रा फडणवीसांना शहं देण्यासाठी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विकास यात्रा’ १ ऑगस्टपासून काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती आणि कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी तसेच ५ वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच घाईघाईत आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात करतील.

येत्या शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल. कोल्हापूरातील अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या यात्रेला सुरुवात होईल. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगलं मतदान झाल्याने मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं शिवसेनेकडे वळवण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार असल्याचे समजते.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply