आदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? लवकरच उरकणार साखरपुडा

आशिकी २ सिनेमातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता आदित्य रॉय कपूर गेल्या काही दिवसांपासून आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आदित्यला अनेकदा दिवा धवनसोबत स्पॉट केले गेले असून ही जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त समोर येत असते. मात्र, या जोडीनं हे वृत्त नेहमीच फेटाळलं आहे.

दिवा केवळ आपली चांगली मैत्रिण असल्याचं आदित्य नेहमी म्हणत असतो. मात्र, आता समोर आलेल्या वृत्तानुसार आदित्य लवकरच दिवासोबत साखरपुडा उरकणार असून पुढील वर्षी ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. आदित्यच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची ठरणार आहे

दुसरीकडे चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, आदित्य नुकताच कलंक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या सिनेमाला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. आता तो सडक २ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. हा सिनेमा २०२० मध्ये १० जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.