InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…म्हणून कोलकाता येथील योगी आदित्यनाथ यांची सभा केली रद्द

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो वेळी मंगळवारी तुफान राडा झाला. यावेळी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज कोलकाता येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची होणारी सभा भाजपतर्फे रद्द करण्यात आली आहे.

“आज दुपारी दोन वाजता कोलकात्यात योगी आदित्यनाथ यांची सभा होणार होती. मात्र काल भडकलेल्या हिंसेनंतर काही लोक योगी आदित्यनाथ यांची सभा होणार असलेल्या ठिकाणी आले व त्यांनी सभा मंडप उभारणाऱ्या कामगारांना मारहाण करत त्यांना तिथून पिटाळून लावले. सदर लोकांनी स्टेजची देखील मोडतोड केली असून आता पुन्हा स्टेज उभारणे शक्य नसल्याने ही सभा रद्द करण्यात आली आहे.” असे भाजप नेते राहुल सिन्हा यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.