कौतुकास्पद! मराठमोळ्या अभिनेत्रीची पुरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत

कोल्हापूर : गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने राज्यातला वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला यामुळेच अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, त्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दुर्घटनेत रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मोठं नुकसान झालं.

मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाली. अनेक संसार उद्धव्स्त झाले. पूरग्रस्त भागाचे राजकीय नेत्यांकडून पाहणी दौरेही सुरु आहेत. यात मराठमोळी दीपाली सय्यदने मोठं दातृत्व दाखवलं आहे. मराठमोठी अभिनेत्री दिपाली सय्यदही पूरग्रस्तांच्या मदतीला पुढे सरसावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे.

अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. अशा नुकसानग्रस्त लोकांना दिपाली सय्यदने मदतीचा हात दिला आहे. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या घरबांधणीसाठी दहा कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत जाहीर केल्यामुळे त्यांचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा