कौतुकास्पद : भारताला भालाफेकीत अजून एक ‘सुवर्णपदक’!

जपान : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. एवढेच नव्हे, तर या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे. त्याने एफ-६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

पॅरालिम्पिकमध्ये भारताची शानदार कामगिरी सुरूच आहे. सुमितच्या आधी भारताला नेमबाजीतही सुवर्णपदक मिळाले आहे. भारतासाठी हे सलग दुसरे सुवर्ण आहे. अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.

”आमचे खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये चमकत आहेत! पॅरालिम्पिकमधील सुमित अंतिलच्या विक्रमी कामगिरीचा राष्ट्राला अभिमान आहे. सुमितने प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुला भविष्यासाठी शुभेच्छा”, असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमितचं कौतुक केले आहे.

रस्त्यावर झालेल्या अपघातात एक पाय गमावलेल्या सुमितचे हे पदक इतरांसाठी प्रेरणेचे काम करणार आहे. सुमित हा मूळचा हरयाणाचा आहे. याआधी नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्येच सुवर्णपदक पटकावले होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा