कौतुकास्पद : कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये भारताने अमेरिकेलाही टाकलं मागे !

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५३ लाखांवर गेली आहे. मात्र देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, या धोकादायक विषाणूवर मात करणऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

भारताने कोरोना रिकव्हरी रेटमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षाही अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत अव्वल स्थानी असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९३,३३७ रुग्णांची नोंद झाली. देशातील ९५ हजार ८८५ जण करोनामुक्त झाले आहे. दिलासादायक म्हणजे देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७९.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात ४२ लाख रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्याचं देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.