कौतुकास्पद : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू दीपक-रवी सेमीफायनलमध्ये दाखल

मुंबई : टोकियोमध्ये सध्या चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत दोन पदकं पडली आहे. त्यातच आता ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तींच्या सामन्यास सुरूवात झाली आहे. यातच भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया आणि रवी दहिया यांनी कुस्ती स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

कुस्तीमध्ये पुरूषांच्या 86 किलो वजनीगटात दीपक पुनियाने अखेरच्या काही सेकंदात निर्णायक डाव टाकत दमदार विजय मिळवला. चीनचा कुस्तीपटू शेन यांच्याशी झालेल्या सामन्यात दोघांनी आक्रमक खेळी केली. त्याचबरोबर त्याने सेमीफायनलमध्ये मजल मारली आहे.

तर दुसरीकडे 57 किलो वजनीगटात रवी कुमार दहियाने दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. बल्गेरियाच्या कुस्तीपटूविरूद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रवी दहियाने आक्रमक खेळी करत सुरूवातीपासून सामन्यावर वर्चस्व प्रस्तापित केलं. अखेरच्या लढाईत त्याने 14-4 अशी आघाडी घेतली आणि टेक्निकल सुपियाॅरिटी जोरावर त्याने विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा