लॉकडाऊनमधील कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध मार्गदर्शिकेचे ॲड.ठाकूर यांनी केले प्रकाशन

केवळ आरक्षणाने महिलांची सर्वांगीण प्रगती साध्य होणार नसून त्यासाठी त्यांचे हक्क आणि आदर दिला गेला पाहिजे. महिलांवरील कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक असून तरुण पिढीला शिक्षणातूनच याविषयीच्या नैतिक मूल्यांचे धडे देण्याची गरज आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

‘मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी राजकारणात आले’

‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ (आयजेएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लॉकडाऊन काळातील कौटुंबिक हिंसाचार : सामना व सुरक्षिततेचे उपाय’ याविषयीच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन काल ॲड.ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले.

Loading...

देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा, महिला  व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध कक्षाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, निवृत्त न्यायमुर्ती रोशन दळवी, आयजेएमच्या संचालिका मेलिसा वालावलकर, टाटा सामाजिक संस्थेच्या तृप्ती पांचाळ, राज्य महिला आयोगाचे अधिकारी, कर्मचारी आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.