Advay Hire । भाजप नेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश; शिवबंधन हाती बांधताच म्हणाले…
BJP | नाशिक : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र आता उद्धव ठाकरे गटात देखील इनकमिंग सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा नेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही असंख्य लोकांना भाजपात चांगल्या पदावर बसवलं. पण ५० लोक भाजपच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे पक्षाला काय झालंय, हेच कळत नाही. पक्षाला आमची गरज राहिली नाही, अशी खंत अद्वय हिरे यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, “मी ठाकरे गटात प्रवेश करणार म्हटल्यावर कालपासून मला असंख्य भाजप नेत्यांचे फोन सुरु झाले. पण मी म्हटलं कितीही खोके दिले तरी पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी माझी औलाद नाही.”
अद्वय हिरे यांचा शिवसेनेतला प्रवेश जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो हिरे कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत अद्वय हिरे शिवसेनेमुळे विधानसभेत पोहचू शकले नाहीत, आता शिवसेनेमुळेच ते विधानसभेत पोहचणार आहेत, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेतून कितीही बाजारबुणगे निघून गेले तरीही काहीही फरक पडत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना टोला लगावला आहे. आत्तापर्यंत ज्यांना आम्ही हिरे समजत होते ते सगळे गद्दार निघाले. बरं झालं गद्दार निघून गेले आणि हिरे आपल्याकडे आले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांच्या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | “पहाटेच्या शपथविधीच्या कटात ठाकरेंचाही हात”; भाजपचा गंभीर आरोप
- Chandrashekhar Bawankule | “प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे”; मनुस्मृतीवरील विधानावरुन बावनकुळेंचा हल्लाबोल
- BJP | सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्या करणार जाहीर!
- Prakash Ambedkar | MIM सोबतची युती का तुटली?; प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं कारण
- BJP | जगाला खरं कळेल तेव्हा पवारसाहेब अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत; भाजप नेत्याचा विश्वास
Comments are closed.