InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर राज्य सरकारची जाहिरातबाजी

- Advertisement -

कोल्हापूरसह सांगलीत पूरस्थितीमुळे लोकांच्या जगणामरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना सत्ताधाऱ्यांना मात्र स्वतःची ब्रँडिग करण्याचं सुचत आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात येत आहेत.

पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. पीडितांची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजी केली आहे. पूरग्रस्तांना वाटण्यात आलेल्या अन्न-धान्यावर चक्क स्टीकर्स चिटकवल्याचा प्रकार समोर आला आहे.राज्य शासनातर्फे पूरग्रस्तांना सध्या मदतीचं वाटप सुरु आहे. यामध्ये धान्याचा समावेश आहे.

- Advertisement -

सरकार स्वत:चं कर्तव्य बजावतानाही जाहिरातबाजी करता का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच, काही नेटीझन्सने फेसबुकवरुन हे फोटो शेअर करताना, सरकारला परिस्थितीचे गांभिर्य नसल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.