Afeela Electric Car | लवकरच लाँच होणार ‘सोनी-होंडा’ची जबरदस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत

Afeela Electric Car | टीम महराष्ट्र देशा: दिग्गज टेक कंपनी सोनी (Sony) आणि आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी होंडा (Honda) मिळून एकत्र इलेक्ट्रिक कार (Electric Car) वर काम करत आहे. या गाडीची विक्री सर्वप्रथम अमेरिका, युरोप आणि जपान बाजारामध्ये केली जाणार आहे. नुकतीच ही कार कंजूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारच्या डिजाईन, फीचर आणि किमतीबद्दल जाणून घेऊया.

डिजाईन

या कारच्या डिझाईन बद्दल बोलायचे झाले, तर या कारमध्ये एक फ्रंट एंड, नवीन डॅशबोर्ड, 2-स्पोक स्टीयरिंग व्हील, ग्रे इंटीरियर आणि ड्युअल-स्क्रीन सेटअप, डेटाइम रनिंग लाइट्स इत्यादी गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींमुळे ही कार अधिकच आकर्षक बनली आहे.

फीचर्स

या फ्युचरस्टिक इलेक्ट्रिक कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असेल. यामध्ये सॉफ्टवेअर सिस्टीम क्लाऊड आधारित सबस्क्रीप्शन फीचर्स इत्यादी गोष्टींचा समावेश असेल. त्याचबरोबर या कारमध्ये ADAS लेव्हल-3 तंत्रज्ञान दिलं जाऊ शकते. या कारच्या पावर पॅक आणि रेंजबद्दल अद्याप कुठलीही माहिती मिळाली नाही. मात्र, अंदाजानुसार ही कार एका चार्जमध्ये 600 किमी पर्यंत जाऊ शकेल.

किंमत

कंपनी ही कार 2026 मध्ये लाँच करेल, अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतरच या कारच्या किमतीबद्दल माहिती मिळेल. पण अंदाजानुसार या कारची किंमत तीस लाख रुपयापर्यंत असू शकते. कंपनी या कारचे बुकिंग 2025 मध्ये सुरू करणार आहे.

ही इलेक्ट्रिक कार भारतामध्ये टाटा इलेक्ट्रिक कार Tata Punch आणि Citroen या कारसोबत स्पर्धा करू शकेल.

महत्वाच्या बातम्या