Afg vs Pak Fight | सामन्यादरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर दिग्गज पाकिस्तानी खेळाडूला देण्यात आली ‘ही’ शिक्षा

Afg vs Pak Fight | नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण होते. पाकिस्तानी आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा फरीद अहमद यांच्यात मैदानातील वातावरण चांगलेच तापले. त्याचवेळी, यानंतर आयसीसीने या दोन्ही खेळाडूंवर मोठी कारवाई करत त्यांना त्यांच्या मॅच फीच्या 25-25 टक्के दंड ठोठावला आहे.

खेळाडू आणि खेळाडूंच्या समर्थन कर्मचार्‍यांवरील ICC आचारसंहितेच्या कलम 2.6 चे उल्लंघन केल्याबद्दल आसिफ अली दोषी आढळला आहे. या कलमांतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडूला चिथावणी देणे, आक्रमक कारवाई करणे किंवा एखाद्याचा अपमान करणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच वेळी, फरीद कलम 2.1.12 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहे, ज्यामध्ये खेळाडू, समर्थन व्यक्ती, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तिसोत धक्काबूक्की करण्याच्या गुन्ह्याचा समावेश आहे.

सामनाधिकारी अँडी पायक्राफ्टने ठोठावलेला दंड-

दोन्ही खेळाडूंनी आपली चूक मान्य केली असून सामनाधिकारी अँडी पायक्राफ्टने ठोठावलेला दंड मान्य केला आहे.

आसिफ अलीने केली धक्काबुक्की-

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शेवटच्या क्षणांमध्ये अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला होता. 19व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आसिफ अली बाद झाल्यानंतर फरीद अहमद आनंद साजरा करत होता. त्याने आसिफ अलीच्या थोडे जवळ जाऊन सेलिब्रेशन केले. यादरम्यान आसिफ अलीने त्याला धक्काबुक्की केली. यानंतर पुन्हा एकदा दोघे एकमेकांच्या जवळ आले. असिफ अलीनेही बॅटने फटके मारण्याचा प्रयत्न केला. पंच आणि इतर खेळाडूंनी येऊन प्रकरण शांत केले. या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी सीईओ शफिक स्टॅनिकझाई यांनीही आसिफ अलीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

या सामन्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये देखील हाणामारीही झाली. अफगाणिस्तानचे चाहते पाकिस्तानी चाहत्यांवर खुर्च्या फेकताना दिसले.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.