InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शाहिद आफ्रिदीने सर्वात जलद शतक ठोकण्यासाठी वापरलेली बॅट, भारताच्या ‘या’ महान खेळाडूची

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या गेम चेंजर या आत्मचरित्रातून बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. याआधी गौतम गंभीर हा अंहकारी खेळाडू असल्याचे आत्मचरित्रात म्हटले असल्याचे समोर आले होते. आता शाहिद आफ्रिदीने 37 चेंडूमध्ये ठोकलेल्या सर्वात जलद शतकासंबंधी माहिती समोर आली आहे.

लंकेविरुद्ध आफ्रिदीनं 37 चेंडूंत आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम केला होता. हे शतक ठोकताना आफ्रिदीने वापरलेली ती बॅट त्याची नव्हतीच, हे शतक आफ्रिदीने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या बॅटीतून साकारले होते.

आफ्रिदीने 37 चेंडूंत सर्वात जलद शतक ठोकले, त्याच्या 40 चेंडूंतील 102 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply