InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोदींच नेतृत्त्व मिळाल्यामुळे केवळ 48 तासात कलम 370 बाद

- Advertisement -

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यासाठी भाजप मागील 70 वर्ष आंदोलन करत होते. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे कणखर नेतृत्त्व मिळाल्यामुळे केवळ 48 तासात कलम 370 हटविण्यात आले, असे वक्तव्य भाजपाचे महासचिव राम माधव यांनी केले आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे. 31 ऑक्टोबरनंतर जम्मू-काश्मीर काही काळासाठी केंद्रशासित राज्य असेल, असेही माधव यांनी सांगितले.

 

Loading...

- Advertisement -

Loading...

राम माधव हे जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर आहेत. त्यावेळी बोलताना राम माधव म्हणाले, भाजप मागील 70 वर्षापासून कलम 370 हटविण्यासाठी आंदोलन करत होती. मात्र देशाला सक्षम नेतृत्त्व मिळत नसल्याने तो मुद्दा प्रलंबित होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे कणखर नेतृत्त्व देशाला लाभल्याने केवळ 48 तासात कलम 370 हटविले गेले.जम्मू-काश्मीरला वेगळय़ा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरलालडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.