‘एमटीएनएल’चेही निम्मे कर्मचारी घेणार स्वेच्छानिवृत्ती

महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे (एमटीएनएल) 13 हजार 500 पेक्षा जास्त कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत. भारत संचार निगम लिमिटेडपाठोपाठ (बीएसएनएल) “एमटीएनएल’च्या निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे.

“एमटीएनएल’ने कर्मचाऱ्यांसाठी देऊ केलेल्या ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत 13 हजार 500 कर्मचाऱ्यांनी अर्ज केला आहे. केंद्र सरकारने “बीएसएनएल’ आणि “एमटीएनएल’साठी 69 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले आहे. त्यानंतर “बीएसएनएल’च्या निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे.

एमटीएनएलने सुरुवातीच्या टप्प्यात 13 हजार 500 अर्जांचा अंदाज बांधला होता. मात्र, प्रत्यक्षात 13 हजार 532 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. याविषयी “एमटीएनएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार म्हणाले, स्वेच्छानिवृत्ती योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत 13 हजार 532 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी अर्ज केले आहेत. आमचे अंतर्गत उद्दिष्ट 13 हजार 500 होते. अंतिम मुदतीपर्यंत 14 हजार 500 ते 15 हजार अर्ज येतील अशी अपेक्षा आहे.’

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.