‘चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानानंतर मी सारखा झोपेतून उठतो बघतो की पडलं का काय सरकार’

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे. ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर अजित दादा यांनी मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो बघतो की पडलं का काय सरकार, असं वक्तव्य केलं.

चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय. अमकंय तमकंय… कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे. मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव, असं अजित पवार म्हणाले.

तसंच, ‘पुन्हा सांगतो जो पर्यंत हे तीन पक्ष एकत्र आहे तोपर्यंत कोणाच्या मायच्या लालमध्ये हे सरकार पडण्याची हिंमत आहे ?,’ असं विधान देखील अजित पवारांनी केलं असून यावेळी त्यांचा पारा देखील वाढल्याचे दिसून आले. आता यावर चंद्रकांत पाटील किंवा भाजपमधील नेते काय उत्तर देणार ? हे देखील उत्सुकतेचं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा