देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. भाजपशी थेट मुकाबला करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची जोरदार तयारी सुरु आहे. तर उत्तर प्रदेश निवडणुकीत सत्तधारी भाजप विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं आहे.

त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारकडून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. नुकतेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. तर, राज्य सरकारने कोरोना काळात केलेल्या कामांची जाहिरातबाजीही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल, असा विश्वास योगींनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या 35 वर्षांत कुठलाही मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आला नाही? असा प्रश्न मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना योगींनी मै आऊंगा ना म्हणत मी पुन्हा येईन… असेच म्हटले आहे. तसेच, आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठीच आलो आहोत, माझा जो ट्रेंड सुरू आहे

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या या बोलण्याने महाराष्ट्रातील विधानसभा 2019 आठवल्या शिवाय रहाणार नाही. राज्यातील तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत राज्यातील राजकारण तापवलं होतं. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा