InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

निकालाआधीच सट्टेबाजार तेजीत; अबकी बार देखील मोदी सरकार?

निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला असताना सट्टाबाजारही तेजीत आला आहे. निवडणुकीनंतर देशात कोणाची सत्ता येईल इथंपासून राज्यात कोणत्या पक्षाचा बोलबाला असेल यावर सध्या सट्टा लावला जातो. आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला असून परवापर्यंत हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.

सट्टाबाजारात सध्या केंद्रात एनडीएला 307 जागांसह बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली असून यूपीएला 106 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीला 34 ते 35 जागा मिळतील तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ते 13 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील यावरही मोठ्या प्रमाणात सट्टा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.