‘‘अभिनंदन विराट…”, कसोटीचं कर्णधारपद सोडताच बीसीसीआयनं कोहलीसाठी केलं ‘असं’ ट्वीट!

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल जाहीर केले होते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवून ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपली होती. यानंतर आज विराट कोहलीने आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने आपला निर्णय जाहीर केला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आज शनिवारी संध्याकाळी विराटने ट्विटरवरून कसोटी कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. एक संदेश देताना त्याने संघाच्या कर्णधारपदाची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले.

यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर आपली प्रतिक्रिया दिली. बीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, बीसीसीआय टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन करते, ज्याने आपल्या प्रशंसनीय नेतृत्व गुणांमुळे संघाला अभूतपूर्व उंचीवर नेले. त्याने ६८ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून ४० विजय मिळवले आणि तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा