InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा..!

- Advertisement -

सासु – सुना आणि परंपरा या दोन्हींमधील वेगळेपणा सोमवारी शहरात समोर आला. काशिनाथनगर भागातील सुंदराबाई दगडू नाईकवाडे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी आयुष्यात सुनांना मुलींप्रमाणे माया – प्रेम लावले. त्यांची प्रेतयात्रा निघाल्यानंतर लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनीषा जालिंदर नाईकवाडे व मीना मच्छिंद्र नाईकवाडे यांनी खांदा दिला. नात्यातील जिव्हाळा आणि परंपरेला छेद असा अनोखा संगम शहरवासियांनी सोमवारी पाहीला.

- Advertisement -

चोघींनी प्रेमापोटी प्रथेला आणि परंपरेला फाटा देत अंत्ययात्रेत पार्थिवाला खांदा दिला. परंपरेला मोडीत काढून स्त्रीला सुख दुःखामध्ये समान अधिकार असावेत असा उत्तम संदेश या निमिताने समाजापुढे ठेवला आहे. सुशिक्षित असलेल्या नाईकवाडे कुटुंबानी दुःखामध्ये पण सामाजिक संदेश दिला. लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनीषा जालिंदर नाईकवाडे आणि मीना मच्छिंद्र नाईकवाडे अशी 4 सुनांची नावं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.