InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

तब्बल सात वर्षानंतर नाझरे धरण १०० टक्के भरले; जेजुरी सह ४७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

- Advertisement -

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरी सह 47 गावाची तहान भागवणारे  नाझरे धरण तब्बल सात वर्षानंतर शंभर टक्के भरलय. त्यामुळे या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त  केलाय. पुरंदरच्या पुर्व भागात असलेले हे धरण पुरंदरच्या पुर्व भाग तर बारामतीच्या पश्चिम भागासाठी जीवनदायी ठरते आहे.

गेल्या सात वर्षांत पुरंदरच्या पश्चिम भागात फारच कमी पाउस पडत होता.त्यामुळे हे धरण पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. 30 जुन पासुन या धरणातील पाणीसाठा पुर्णपणे संपला होता.या धरणावरील पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या होत्या.मात्र गेल्या 15 दिवसात या धरणाच्या  पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हे धरण आता ओसांडुन वहात आहे.त्यामुळे बारामती तालुक्यातील पश्चिम भागात  नदीत असणारे छोटे बंधारे भरून या भागातील टंचाई दुर होणार आहे.त्याच बरोबर या धरणावरील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत होणार आहेत.

Loading...

- Advertisement -

नाझरे धरण पुर्ण भरलेय. या धरणाला स्वयंचलित  दरवाजे असुन दाब वाढताच दरवाजे  उघडुन क-हा नदीत पाणी जाते.धरणाची साठवण क्षमता व त्यावरील पाणी पुरवठा योजनांची माहीती देतायत.या धरणाचे  गेल्या अनेक दिवसांपासून नाझरे धरण कोरडे होते. जेजुरीचा खंडेराया ला सुद्धा या नदीत टँकरच्या माध्यमातून स्नान घालण्यात आले होते. हे  धरण आता पूर्ण भरले असुन परिसरातून आनंद व्यक्त होतो.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.