ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर, भाजपाचे टीकास्त्र

मुंबई : ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिला नंबर आला आहे, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला. ते दिल्लीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिला नंबर आला, असा टोला लागवताच दानवे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभावर प्रश्न उपस्थित केले.

काही गणित केंद्राने सोडवली तर आता काहीसे गणिते राज्य सरकारने सोडवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा सर्वेक्षणात पहिला क्रमांक आला आहे. ते ऑनलाईन परीक्षेत पास झाले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, नाहीतर जनता त्यांना माफ करणार नाही, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी केला.

दरम्यान, लोकल रेल्वे सर्व सामन्यांना सुरू करण्याचा निर्णय एक मिनिटात घेऊ. राज्याने फक्त अहवाल पाठवावा. आम्ही राज्य सरकारच्या अहवालाशिवाय निर्णय घेऊ शकत नाही, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं. राज्य सरकार निर्णय घेत नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे, असं दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा