पवारांच्या आवाहानानंतर ही नातू चिपळूण दौऱ्यावर; आजोबांचा सल्ला फक्त विरोधकांसाठी होता का ?

मुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि इतर भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेते पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणालेत मदतकार्यात गुंतलेल्या यंत्रणेवर ताण पडू नये म्हणून राजकीय नेत्यांनी सध्याच पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचे मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होते म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवे, असे मला वाटते.

असं अवाहन शरद पवार यांनी केलं होत. मात्र, त्यांच्या आवाहनानंतरही शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार चिपळूण दौऱ्यावर गेले. याच आजोबांचा सल्ला नातवाला मान्य का नाही. सल्ले काय फक्त राज्यपाल आणि विरोधी पक्षांसाठी आहे होते काय? अशी विचारणा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन केल्यानंतरही रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली. याच मुद्द्यावरून सदाभाऊ खोत यांनी ट्विटवरून पवारांना टोला लगावला आहे. आजोबांनी सांगितले… राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करू नयेत. आजोबांच्या सल्ल्याला नातवाचं मान नाही आणि जामखेडचे आमदार चिपळूणच्या दौऱ्यावर… आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता? नेमका याच मुद्द्यावरून खोत यांनी सवाल उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा