InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सैराट नंतर आता येणार ‘मुळशी पॅटर्नचा’ रिमेक….

करण जोहरने मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा ‘सैराट’चा हिंदी रिमेक तयार केल्यानंतर आता बॉलीवूडचा दबंग सलमान खान हा नुकताच रिलीज झालेला मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक तयार करणार आहे. सलमान या चित्रपटात मुख्य भूमिकेत त्याच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा याला घेणार आहे. सलमानने आयुषची भेट घेऊन मुळशी पॅटर्नच्या रिमेकविषयी चर्चा केली असून सध्या ते चित्रपटासाठी हिरोईनच्या शोधात आहेत.

सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाच्या रिमेकसाठी तयारी सुरू केली आहे. हा चित्रपट गुन्हेगारी विश्वावर असल्याने आयुषला अॅक्शन सिनसाठी ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. येत्या 2019च्या मध्यापर्यंत या चित्रपटाचे शूटींग सुरू होऊ शकते.

आयुष शर्मा याने ऑक्टोबर महिन्यात सलमान खानचे प्रोडक्शन असलेल्या लव्ह यात्री या चित्रपटातून पदार्पण केले होते. तसेच लवकरच आयुष संजय दत्त सोबत एक चित्रपट करणार असून या चित्रपटाचे शूटींग देखील 2019 मध्ये सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply