राणी मुखर्जीला पाहिल्यावर सलमान खानला आठवते ‘ही’ भाजी !

अभिनेत्री राणी मुखर्जी मागच्या काही दिवसांपासून तिचा आगामी सिनेमा ‘मर्दानी 2’मुळे खूपच चर्चेत आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी असून नुकतीच तिनं सलमान खान होस्ट रिअलिटी शो बिग बॉस 13 मध्ये हजेरी लावली. यावेळी या दोघांनीही खूप धम्माल केली. या दरम्यानचा राणी आणि सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामुळे सलमान खाननं राणीला पाहिल्यावर त्याला एका विशिष्ट भाजीची आठवण येते हे सांगितलं आहे.

सलमान तिला एक टास्क देतो. ज्यात सलमान खान काही सिनेमांची नावं अभिनय करुन दाखवतो आणि तिला ते ओळखायचं असतं. त्यानंतर राणी मुखर्जी सलमान एक टास्क देते ज्यामध्ये सलमानला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. यावेळी राणीनं सलमानला विचारलं मला पाहिल्यावर तुला कोणती भाजी आठवते. यावर सलमान झटकन उत्तर देतो. ‘बटाट्याची भाजी’.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.