InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

वर्ल्डकपच्या संघात निवड होताच रविंद्र जडेजाने जाहीर केला भाजपला पाठिंबा

पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये मागील काही दिवसांपासून क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरलेल्या रविंद्र जडेजाची देखील निवड करण्यात आली. जडेजाच्या निवडीनंतर अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले.

वर्ल्डकपसाठीच्या संघात निवड झाल्यानंतर अवघ्या चार तासात रवींद्र जडेजाने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. जडेजाने भाजपला पाठिंबा घोषित केल्यानंतर जडेजाच्या या निवडीमागे भाजप कनेक्शन आहे का? असा सवाल अनेक क्रीडारसिंकांनी उपस्थित केला आहे.

जडेजाने ट्वीट करुन भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जडेजाचे ट्वीट रीट्वीट करत त्याचे आभार मानले आहेत. तसेच वर्ल्डकपसाठी संघात निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदनही केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.