एकनाथ खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार; राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा

पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे एकनाथ खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत शरद पवारांकडे मतदार संघातील काही प्रकल्पांबाबत चर्चा केल्याची माहिती खडसेंनी दिली. मात्र, सुमारे अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या गेल्यात. पक्षात डावललं जात असल्यानं खडसे व्यथित झालेत.

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे काल दिल्लीला गेले होते. त्यांच्या या दौऱ्यामागे भाजपमधील ओबीसी नेत्यांच्या नाराजीची पार्श्वभूमी आहे. गेल्या आठवड्यात पंकजा मुंडेंची भेट घेऊन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी ‘ओबीसी नेत्यांना डावललं जातंय’ अशी आपल्या मनातली अनेक दिवसांची खदखद व्यक्त केली. शनिवारी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतरही कटुता कमी झाली नव्हती.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.