रात्रशाळेत अभ्यास करून आई, आजी दहावीत पास ,

दहावीचा निकाल नुकताच लागला. यात अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले मात्र, पण काळाचौकीतील मायलेकीने एका शाळेतून परीक्षा देऊन त्यात माय अव्वल ठरली. तर आजींनीही परीक्षा देत यश मिळवले.

काळाचौकीत अनुश्री, तिची आई कविता आंबेरकर (कदम) राहतात. कविता यांनी रात्रशाळेतून अभ्यास करून ६० टक्के गुण मिळवले. मुलगी अनुश्रीपेक्षा २ टक्के गुण त्यांना जास्त मिळाले आहेत. घरी तीन मुलं आणि एकत्रित कुटुंब असणाऱ्या कविता यांची लग्नाआधीच शाळा सुटली. मात्र शिक्षण घेण्याची इच्छा कायम होती.

मुलगी दहावीला आल्यानंतर तिच्यासोबतच आपणही दहावी देऊ अशा विचाराने त्यांनी अहिल्या नाइट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. घरकाम आणि मुलांचा सांभाळ करत त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यांनी ६० टक्के गुण मिळविले. पुढेही शिक्षण घ्यायची त्यांची इच्छा आहे .

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.