सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता करणार होती ‘ही’ मोठी गोष्ट !

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 14 दिवस उलटले आहेत. तरीदेखील अद्याप या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. याउलट हे प्रकरण आणखी गुंतत चाललं आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्या कुटुंबाला दुसऱ्या राउंडच्या चौकशीसाठी बोलवणार आहेत. सुशांतच्या निधनांमुळे तिच एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर आपली कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार अंकिता आणि सुशांतच्या मित्र संदीप सिंग म्हणाला, अंकिता खूप भावूक मुलगी आहे. अंकिता आणि सुशांत सात वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. गेल्या काही दिवसांत मी जेव्हा ही तिच्याशी बोललो आहे तेव्हा ती फक्त रडली आहे.

रविना टंडन, फराह खान, भारती सिंगविरुध्द गुन्हा दाखल
रिपोर्टनुसार, एका मुलाखती दरम्यान संदीप म्हणाला, अंकिताला सुशांतच्या अंतिम संस्कारात सहभागी व्हायचे होते, पण तिची अवस्था बघून कुटुंबीयांनी तिला परवानगी दिली नाही. संदीप म्हणाला, सुशांतच्या जाण्याचा अंकिताला जबरदस्त धक्का बसला आहे. अंकिता सुशांतची फक्त गर्लफ्रेंड नव्हती ती त्याची आईप्रमाणे काळजी घ्यायची. सुशांतच्या आवडीचे जेवण करायची.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलियर्सचे होणार पुनरागमन ?
अंकिताच्या घरचे इंटिरिअरदेखील सुशांतच्या आवडीचे होते. अंकिता सुशांतला घेऊन खूप इमोशनल होती. सुशांतचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सुशांतसाठी जवळपास तिने अभिनय सोडला होता. टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा असल्याने तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. ब्रेकअपनंतरही सुशांतचा कोणताही सिनेमा शुक्रवारी रिलीज होताच अंकिता देवाकडे त्याच्या यशासाठी प्रार्थना करायची.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.