InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला!

शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळालीय. 30 एप्रिलनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 600 हून अधिक घसरण होऊन सुरू आहे. निफ्टी  11600च्या खाली सुरू आहे.

मोठ्या शेअर्सबरोबर मिड आणि स्माॅल कॅप शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळतेय. बीएसईचा मिड कॅप 0.99 टक्क्यांनी घसरलाय आणि तो 14, 579.71च्या स्तरावर दिसतोय.BSE सेन्सेक्सची 621.15नं घसरण होऊन आता तो 38,892.24 या अंकांवर आहे.

शेअर बाजारात आज चहू बाजूंनी घसरण पाहायला मिळतेय. निफ्टीच्या आॅटो इंडेक्समध्ये 2.12 टक्के, एफएमसीजी इंडेक्स 1.15 टक्के, आयटी इंडेक्स 1.01 टक्के, मीडिया इंडेक्स 1.18 टक्के, मेटल इंडेक्स 0.15 टक्के, फार्मा इंडेक्स 0.31 टक्के आणि रियल्टी इंडेक्स 1.49 टक्क्यांच्या घसरणीनं कारभार करतोय.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply