शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांची सारवासारव म्हणाले…

जळगाव : औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी बोलताना कोश्यारी यांनी म्हटलं की, चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असंही ते म्हणाले होते. यानंतर राज्यपालांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्या होत्या.

भगतसिंह कोश्यारी यांनी आता त्यांनी केलेल्या वक्तव्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोशारी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कोशारी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, मला जेवढे जानकारी आहे समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून मी ते वक्तव्य केलं, असे पत्रकारांशी बोलताना कोश्यारी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या