InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पराभवानंतर टीम इंडियात दोन गट

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडच्या संघाने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. भारतीय संघाच्या या पराभवानंतर साहजिकपणे, पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. बीसीसीआयनेही भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेतली असून, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासोबत क्रिकेट प्रशासकीय समितीचे अधिकारी बैठक घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपांत्य फेरीतील पराभवानंतर टीम इंडियात दोन गट पडले आहेत.

भारतीय संघातील एका खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ सध्या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. ‘Times Now’ या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply