घटस्फोटानंतर समांथाने केली चित्रपट चित्रीकरणास सुरुवात, लवकरच झळकणार ‘या’ चित्रपटात

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या सगळ्या चर्चेत आता समांथा विषयी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे समांथा लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे.

ड्रिम वॉरियर पिक्चर या प्रोडक्शन हाऊसने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. त्यांनी समांथाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटात समांथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. समांथा तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित शांतरुबन ज्ञानसेकरन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती एसआर प्रकाश बाबू आणि एसआर प्रभू करणार आहेत. हा चित्रपट तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा