भाजपमधील प्रमोशननंतर पंकजा मुंडें म्हणाल्या, “हा माझा…. “

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा माझा सन्मान आहे,’ असं ट्वीट पंकजांनी केलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपल्यावर विश्वास दाखवल्यावर पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय नेत्यांचे आभार मानले आहेत. तसंच, आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नड्डा यांचेही आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.