ठाकरे सरकारने दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा दिल्यानंतर, लसीकरण केंद्रावर गर्दी, वसई-विरारमध्ये झुंबड

वसई विरार : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरत चालली आहे. दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पूर्णपणे निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. दरम्यान मुंबईची लाइफलाइन लोकल देखील बंद आहे. यामुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केलेल्या लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. आता उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला याविषयी सूचना दिल्या असल्याची माहिती आहे.

याविषयी उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का दिली जात नाही. लसीकरण झालेल्या नागरिकांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा’ अशा सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा दिलीय. मात्र यानंतर वसई विरार महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर एकच झुंबड उडाली आहे.

आज वसई-विरारमध्ये फक्त 17 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. कालपासून लोकांनी रांगा लावून आपल्याला डोस कधी मिळेल याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र या ठिकाणी वसई विरार महानगर पालिकेचा एकही कर्मचारी दिसत नसल्यानं गोंधळ उडाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती मुंबईतही पाहायला मिळाली. लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासची परवानगी मिळणार असल्याने आता लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. बीकेसी केंद्रावर आज लसीचा मर्यादीत 200 डोस उपल्ध असताना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा