दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा तुरीच पिक धोक्यात

वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा एकदा तुरीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांन समोर नवे संकट उभे ठाकले आहे. सध्या तुरीचे पीक फुलाने व शेंगांनी बहरले असून, पिक चांगल्या स्थितीत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अवकाळी हवामानाचा द्राक्षाला फटका, द्राक्ष निर्यातीवरही परिणाम

या ढगाळ वातावरणाने तूर पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी वेळीच या अळ्यांचा बंदोबस्त केला नाही तर तुरीच पिकही शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे तुरीच्या पिकाला अळीच्या संकटातून वाचविण्यासाठी शेतकरी किटकनाशकाची फवारणी करण्याच्या कामाला लागले आहे.

पुणतांब्यातील कृषीकन्येच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी; आंदोलनही तूर्तास मागे

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.