पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल दोन महिन्यानंतर सलूनची दुकानं उघडली

पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळण्यात आल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अटी आणि शर्तीसह उघडण्याची मुभा महानगरपालिकेने दिली होती. त्यानुसार कंटनमेंट झोन वगळून इतर भागातील बहुतांश सलूनची दुकान खुली झाली आहेत.

धक्कादायक : सलूनमध्ये गेलेल्यांना झाली कोरोनाची लागण ; 9 जण निघाले पॉझिटिव्ह

दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सलून उघडण्यात आल्याने १ जूनपासून हेअर कट आणि दाढीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री बसू शकते.

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात ; शरद पवारांचा फडणविसांना टोला

पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने खुली करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार हळूहळू शहरातील दुकाने खुली होत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सलून चालकांना महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलासा देत सलून खुली करण्यास परवानगी दिली. त्यानुसार दोन महिन्यानंतर सलूनची दुकानं परवानगी घेऊन उघडण्यात आली आहेत. सलूनच्या बाहेर सॅनिटायझर ठेवण्यात आले असून आत पाच पेक्षा अधिक खुर्च्या असतील तर तीन जणांना आत हेअर कट करता येईल, असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.