मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखाणारच, मराठा,धनगर समाजाचा विरोध कायम
पालकमंत्र्यांच्या बैठकीवरही आंदोलकांचा बहिष्कार
टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखाणारच, मराठा,धनगर समाजाचा विरोध कायम. मुख्यमंत्र्याच्या महापूजेला मराठा आणि धनगर समाजाचा विरोध कायम आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीवरही आंदोलकांनी बहिष्कार टाकला. आंदोलक निर्णयावर ठाम असल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे.
येत्या 23 जुलैला आषाढी एकादशी आहे. या एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते संपन्न होत असते. या पूजेला मराठा क्रांती मोर्चा, महादेव कोळी समाज आणि धनगर समाजाच्या नेत्यांनी प्रखर विरोध दर्शविलाय. तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरमध्ये लाखो वारकरी भक्तीभावाने येतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी आंदोलन करु नये. तसेच झाल्यास हे आंदोलन लाखो वारकऱ्यांविरुद्धचे ठरेल, म्हणून पंढरपूर येथे आंदोलन करु नये, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.
दरम्यान,मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे, मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागास वर्ग आयोगाच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. शासनातर्फे दोन टप्प्यांत ७२ हजार पदांची महाभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये १६ टक्के पदे मराठा आरक्षण मिळेपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे . तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असून त्यानुसार केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल. त्यामुळे या दोन्ही बाबींवर पंढरपूर येथे आंदोलन करु नये. या ठिकाणी लाखो वारकरी भक्तीभावाने येतात. त्यामुळे आंदोलन करु नये, असे आवाहन त्यांनी निवेदनाद्वारे केले.
काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या मागण्या :
मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
‘क्या हुआ तेरा वादा…’ धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांना ऐकवली गाणे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.