तुमचे आंदोलन कुणाच्या विरोधात? संभाजीराजेंच्या आंदोलनावर शिवसेनेचे प्रश्नचिन्ह

मुंबई : ३४८व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संभाजी छत्रपती यांनी येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्याची घोषणा केली. या आंदोलनाला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मात्र या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आंदोलन कुणाच्या विरोधात केले जात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का?; असा प्रश्न अरविंद सावंत यांनी संभाजीराजेंना केला आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्याने पहिल्यांदाच थेट संभाजीराजेंनाच प्रश्न विचारल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. छत्रपती संभाजीराजे भाजपकडून राज्यसभेत खासदार म्हणून गेले आहेत. कोणाविरुद्ध लढतो? कशासाठी लढतोय? हे त्यांनी ठरवलं पाहिजे.

सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात दिसत आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला. संभाजीराजेंचा आम्ही मोठ्या मनाने आदर करतो. भाजपचा या आंदोलनाला छुपा पाठिंबा असू शकतो. राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे आंदोलन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय की राज्य सरकार विरोधात आहे? हे संभाजीराजेंनी आधी स्पष्ट केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा