InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी – पंकजा मुंडे

‘सकाळ अॅग्रोवन’ने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद् घाटन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलतांना त्या म्हणाल्या  शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे, असा सल्ला राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.

राज्याला दुष्काळाची मोठी परंपरा आहे. यापुढे दुष्काळाशी सामना करावा लागेल. दुष्काळाचे वास्तव स्वीकारूनच पुढे कामे करावी लागतील असे ‘सकाळ अॅग्रोवन’चे  संपादक आदिनाथ चव्हाण यांनी सांगितले.

फक्त उत्पादकता वाढली म्हणजे शेतकरी समृद्ध होतील असे नाही.  शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा मोलाचा भाग आहे. त्यामुळे सरकारने शेतक-याला सशक्त करणा-या भूमिका खर्चिक असल्या तरी घेतल्या पाहिजे. शेतक-याला प्रशिक्षण मिळावे. आयात-निर्यात विषयक निर्णय वेळेत घेण्याची आवश्यकता आहे. प्रक्रिया प्रकल्पांना चालना दिली पाहिजे, असा आग्रह पंकजा मुंडे यांनी धरला.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply