Agriculture – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Fri, 01 Nov 2019 09:29:32 +0530 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.3 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Agriculture – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 “बिंदुसरा’ काठोकाठ; “माजलगाव’ मध्ये 71 टक्के जलसाठा https://inshortsmarathi.com/bindusara-dam-beed-news/ https://inshortsmarathi.com/bindusara-dam-beed-news/#respond Fri, 01 Nov 2019 09:29:32 +0000 http://inshortsmarathi.com/?p=85730 beed bindusara dam

बीड : जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसामुळे येथील प्रकल्पात 42.28 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तालुक्‍यातील बिंदुसरा प्रकल्प 93.99 टक्के, तर माजलगाव प्रकल्प 71.47 टक्के भरला आहे. मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जोत्याखाली आले आहे. यासह 35 प्रकल्प 100 टक्के भरले असून 32 प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. यासह 32 प्रकल्प जोत्याखाली असून 25 ते […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “बिंदुसरा’ काठोकाठ; “माजलगाव’ मध्ये 71 टक्के जलसाठा InShorts Marathi.

]]>
beed bindusara dam

बीड : जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसामुळे येथील प्रकल्पात 42.28 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तालुक्‍यातील बिंदुसरा प्रकल्प 93.99 टक्के, तर माजलगाव प्रकल्प 71.47 टक्के भरला आहे.

मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जोत्याखाली आले आहे. यासह 35 प्रकल्प 100 टक्के भरले असून 32 प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. यासह 32 प्रकल्प जोत्याखाली असून 25 ते 50 टक्‍क्‍यांत 14 प्रकल्प आहेत. 75 टक्‍क्‍यांत पाच प्रकल्प आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 95.34 टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला होता. यामुळे जिल्हाकरांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. यंदा जिल्ह्यात दमदार पावसाने मॉन्सूनची सुरवात झाली होती; परंतु नंतरच्या मॉन्सूनमध्ये जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिली. यामुळे भरपावसाळ्यात जिल्ह्यात टॅंकर व चारा छावण्या जिल्हा प्रशासनास सुरू ठेवाव्या लागल्या होत्या; परंतु शुक्रवारपासून (ता. 18) जिल्ह्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

परतीच्या पावसामुळे वार्षिक सरासरी पाऊस 95 च्या पुढे ढकलली आहे. जिल्ह्यातील 144 प्रकल्पांपैकी 32 प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. बाकीच्या प्रकल्पात बऱ्यापैकी पाणीसाठा जमा झाला आहे. तीन महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातील प्रकल्पात फक्त 0.22 टक्के पाणीसाठा होता; परंतु सध्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा शून्य टक्‍क्‍यावरून 42.28 टक्‍क्‍यावर गेला आहे.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळ हटण्यास मोठी मदत मिळाली आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा जरी वाढला असला तरी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी परत आर्थिक संकटात सापडले आहेत. या पावसाचा रब्बीच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

शहरकरांचा पाणीप्रश्‍न मिटला

बीड शहराला माजलगाव व बिंदुसरा या दोन प्रकल्पातून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु गेल्या वर्षी अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शहरकरांना 15 ते 20 दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या माजलगाव धरण 71.47 टक्के भरले, तर बिंदुसरा धरण 93.99 टक्के भरले आहे. यामुळे शहरकरांचा पाणीप्रश्‍न मिटला आहे. नगरपालिकेने योग्य नियोजन केले, तर शहरकरांना चार दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकतो.

गलिच्छ राजकारणातून जनतेनं मला मुक्त केलं – पंकजा मुंडे

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “बिंदुसरा’ काठोकाठ; “माजलगाव’ मध्ये 71 टक्के जलसाठा InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/bindusara-dam-beed-news/feed/ 0 85730
तिरु मध्यम प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले https://inshortsmarathi.com/tiru-prakalp-update/ https://inshortsmarathi.com/tiru-prakalp-update/#respond Fri, 01 Nov 2019 08:09:22 +0000 http://inshortsmarathi.com/?p=85711

उदगीर : वाढवणा (ता.उदगीर) येथून जवळ असलेल्या तिरु मध्यम प्रकल्प शंकर टक्के भरला आहे.सातत्याने पाऊस सुरूच असून प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा ओघ सुरूच आहे त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने गुरुवारी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले आहेत. आज शुक्रवारी (ता.1) सकाळी २ दरवाजे पुर्ण आणि १ आर्धा दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असुन तेरु नदी काठच्या गावांना प्रशासना […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तिरु मध्यम प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले InShorts Marathi.

]]>

उदगीर : वाढवणा (ता.उदगीर) येथून जवळ असलेल्या तिरु मध्यम प्रकल्प शंकर टक्के भरला आहे.सातत्याने पाऊस सुरूच असून प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा ओघ सुरूच आहे त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने गुरुवारी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले आहेत.

आज शुक्रवारी (ता.1) सकाळी २ दरवाजे पुर्ण आणि १ आर्धा दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असुन तेरु नदी काठच्या गावांना प्रशासना तर्फे सर्व माध्यमातून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.पाण्याचा ओघ असाच वाढला तर आजून दरवाजे उघडण्यात येईल असे प्रशासना तर्फे कळविण्यात आले आहे.

गेल्या चार वर्षात यावर्षी पहिल्यांदाच हा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. त्यामुळे या भागातील पाण्याची सोय झाली आहे. परतीच्या पावसाने यावर्षी या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांना जीवदान मिळाल्याचे चित्र आहे.

तिरु नदी काठच्या गावांना धरणाच्या पाण्याचा विसर्गाची कल्पना देण्यात आली असून सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी दिली आहे.

कांद्यानंतर आता टॉमेटोचा भाव वधारला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तिरु मध्यम प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/tiru-prakalp-update/feed/ 0 85711
परतीच्या पावसाने खरिप पिकांचे नुकसान https://inshortsmarathi.com/loss-of-crops-due-to-heavy-rains/ https://inshortsmarathi.com/loss-of-crops-due-to-heavy-rains/#respond Wed, 23 Oct 2019 08:36:28 +0000 http://inshortsmarathi.com/?p=85361

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात पावसळ्यात कोरडे असलेले नदी नाले परतीच्या पावसाने ओसाडून वाहू लागल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे खरिप हंगामाच्या पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. घनसावंगी तालुक्यात यंदा पावसाळ्यात पावसाने उशीरा आगमन केले त्याचबरोबर यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला नाही. जो झाला तो ही पोळा सणानंतर उघडला होता. नवरात्रात शेतकर्‍यांना अपेक्षा होती […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. परतीच्या पावसाने खरिप पिकांचे नुकसान InShorts Marathi.

]]>

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात पावसळ्यात कोरडे असलेले नदी नाले परतीच्या पावसाने ओसाडून वाहू लागल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे खरिप हंगामाच्या पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

घनसावंगी तालुक्यात यंदा पावसाळ्यात पावसाने उशीरा आगमन केले त्याचबरोबर यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला नाही. जो झाला तो ही पोळा सणानंतर उघडला होता. नवरात्रात शेतकर्‍यांना अपेक्षा होती पाऊस येईल मात्र तेव्हा आला नाही मात्र नुकताच या आठवड्यात परतीच्या  पावसाने जोरदार आगमन केले यंदा पाऊस सरासरी एतका पडतो की नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

मात्र या आठवड्यातील पावसाने सरासरी गाठली असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यात नदी, नाल्यात पाणी आले नाही जे पाणी आले ते आटून गेले त्यामुळे सिंचन प्रकल्पात पाणीसाठा आला तर नाहीच उलट ही नाले कोरडी पडली होती . या पावसामुळे नदी व नाल्याना चांगले पाणी आले असून विशेष म्हणजे पहिल्यांदा पाणी ओसाडूंन वाहत आहे. या पावसामुळे पाणीपातळीत चांगलीच वाढ होणार आहे. यापुढे पावसांचा असाच चांगला जोर राहील्यास सिंचन प्रक्लपात पाणी जाण्यास मदत होणार आहे.सध्या सुरू असलेला पाऊस हा खरिपातील तूर या पिकासाठी पोषक ठरत आहे. तुरीची चांगली वाढ होत आहे.मध्यतंरी कोरडवाहू कापसांला पाण्यची गरज होती त्यावेळी परतीच्या पावसाने या कापसाला मदत झाली आहे.

मात्र पावसाने चांगलाच जोर धरला आहे. खरिपातील कोरडवाहू शेतीतील कापूस फुटत आहे. बोंडे काळी पडत आहे आधीच या पावसामुळे कपासांचा दर्जा घसरला असतांना पुन्हा या पावसामुळे कापसाचे नुकसान होत असल्याने हा कापूस शेतकर्‍यांना मातीमोल भावात विक्री करावी लागणार आहे.त्यामुळे बाजारभावात नुकसान सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. सोयबीनच्या काढणीच्या कामात व्यस्त असल्याने  ट्रॅक्टर मळणीयंत्र शेतात नेणे कठीण झाले आहे. खरिपांच्या काढणीबरोबर  काही शेतकर्‍यांनी रब्बीची ज्वारीची पेरणी केली आहे त्यांना हा पाऊस चांगला पोषक आहे. तर काही शेतकरी अजून  रब्बीच्या हंगामाच्या मशागतीच्या तयारीला लागला आहे परंतू पावसामुळे ङ्कशागत लांबणीवर पडल्याने गहू, हरभरा या पिकांची पेरणी लाबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. परतीच्या पावसाने खरिप पिकांचे नुकसान InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/loss-of-crops-due-to-heavy-rains/feed/ 0 85361
हिंगोलीतील पावसामुळे अडत व्यापारी झाले हैराण https://inshortsmarathi.com/heavy-rainfall-in-hingoli/ https://inshortsmarathi.com/heavy-rainfall-in-hingoli/#respond Wed, 23 Oct 2019 06:26:45 +0000 http://inshortsmarathi.com/?p=85339

वसमत येथे कधी न झालेल्या पावसामुळे मोंढ्यातील व्यापारी हैराण झाले आहेत.मोंढातील शटर असलेल्या दुकानात रात्री पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले आहे सचिन ट्रेडिंग कंपनी, इरफान ट्रेडिंग कंपनी, मनोज लड्डा ट्रेनिंग कंपनी, हरिओम ट्रेडिंग कंपनी या चारही दुकानात लाखो रुपयांचा माल पाण्याने भिजून पूर्णपणे खराब झाला आहे. आता या व्यापाऱ्यांना मालाचे नगदी पैसे द्यावे […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. हिंगोलीतील पावसामुळे अडत व्यापारी झाले हैराण InShorts Marathi.

]]>

वसमत येथे कधी न झालेल्या पावसामुळे मोंढ्यातील व्यापारी हैराण झाले आहेत.मोंढातील शटर असलेल्या दुकानात रात्री पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले आहे सचिन ट्रेडिंग कंपनी, इरफान ट्रेडिंग कंपनी, मनोज लड्डा ट्रेनिंग कंपनी, हरिओम ट्रेडिंग कंपनी या चारही दुकानात लाखो रुपयांचा माल पाण्याने भिजून पूर्णपणे खराब झाला आहे.

आता या व्यापाऱ्यांना मालाचे नगदी पैसे द्यावे लागतात त्यामुळे व्यापारी अडचणीत आले आहेत तर नाल्या बरोबर नसल्यामुळे या ठिकाणी हा प्रकार घडला आहे असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आ.हे तर नाल्या,रोड व्यवस्थित नाही याला जबाबदार कोण कृषी उत्पन्न बाजार समिती की सरकार हे कळायला मार्ग नाहीये.

कृषी उत्पन्न बाजार समिती यात काय भूमिका बजावते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अडत ्यापार्‍यांनी केली आहे तसेच यानंतर पुन्हा असा प्रकार होऊ नये असे देखील त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितला आहे

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. हिंगोलीतील पावसामुळे अडत व्यापारी झाले हैराण InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/heavy-rainfall-in-hingoli/feed/ 0 85339
सातारा – सांगलीत परतीच्या पावसाने थैमान https://inshortsmarathi.com/due-to-the-rains-major-damage-to-crops-like-sugarcane-soybean-groundnut/ https://inshortsmarathi.com/due-to-the-rains-major-damage-to-crops-like-sugarcane-soybean-groundnut/#respond Wed, 23 Oct 2019 05:32:21 +0000 http://inshortsmarathi.com/?p=85333

राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे सण साजरा करायचा कसा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर सातारा – सांगलीत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शिवाय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. सातारा – सांगली शिवाय पुण्यात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सातारा – सांगलीत परतीच्या पावसाने थैमान InShorts Marathi.

]]>

राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे सण साजरा करायचा कसा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर सातारा – सांगलीत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शिवाय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. सातारा – सांगली शिवाय पुण्यात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून पवसाची रिमझीम सूरू आहे.

सांगली जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम भागातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातील नद्यांनाही पूर आलाय.

दुष्काळी भागातील अनेक गावातील नाले, ओढे ओसंडून वाहू लागलेत. आटपाडी तालुक्यातील तलाव १४ वर्षांनंतर पहिल्यांदा भरला. पुरामुळे भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

दुष्काळी माण तालुक्यात मोठ्या प्रमाण परतीचा पाऊस झाला. त्यामुळे या भागातील माणगंगा नदीला मोठा पूर आलाय. या पावसामुळे आंधळी धरण देखील ओव्हरफ्लो झालंय. तब्बल दहा वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं आणि माणगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं या भागातील लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सातारा – सांगलीत परतीच्या पावसाने थैमान InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/due-to-the-rains-major-damage-to-crops-like-sugarcane-soybean-groundnut/feed/ 0 85333
इजिप्तचा कांदा नवी मुंबईत दाखल https://inshortsmarathi.com/egypt-onion-arrives-in-navi-mumbai/ https://inshortsmarathi.com/egypt-onion-arrives-in-navi-mumbai/#respond Tue, 22 Oct 2019 10:52:37 +0000 http://inshortsmarathi.com/?p=85291

विविध कारणांमुळे राज्यातील कांद्याची आवक कमी होत असल्याने या कांद्याने प्रति किलो 80 ते 100 रुपयांपर्यंत भाव गाठला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यापाऱ्यांनी इजिप्त व अफगाणिस्तानमधून कांदा मागवला. परंतु आता राज्यातील विविध ठिकाणांहून कांद्याची आवक वाढल्याने, विदेशातून आलेला कांदा सध्यातरी तसाच पडून आहे. विदेशातील हा कांदा वातानुकूलित यंत्रणेतून आल्याने त्यात पाणी साचत असल्याने तो खरेदी […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. इजिप्तचा कांदा नवी मुंबईत दाखल InShorts Marathi.

]]>

विविध कारणांमुळे राज्यातील कांद्याची आवक कमी होत असल्याने या कांद्याने प्रति किलो 80 ते 100 रुपयांपर्यंत भाव गाठला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यापाऱ्यांनी इजिप्त व अफगाणिस्तानमधून कांदा मागवला. परंतु आता राज्यातील विविध ठिकाणांहून कांद्याची आवक वाढल्याने, विदेशातून आलेला कांदा सध्यातरी तसाच पडून आहे. विदेशातील हा कांदा वातानुकूलित यंत्रणेतून आल्याने त्यात पाणी साचत असल्याने तो खरेदी करण्यास व्यापारी अनुकूल नसल्याचे व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले.

या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने अनेक ठिकाणी कांदा पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे अपेक्षेइतका पुरवठा होत नव्हता. घाऊक बाजारात कांदा 40 ते 50 रुपये किलो, तर किरकोळ बाजारात कांदा 60 ते 80 रुपये किलो दराने विकला जात होता. म्हणून व्यापाऱ्यांनी इजिप्त व अफगाणिस्तानमधून कांदा मागवला.

सध्या 85 कंटेनर कांदा जेएनपीटी बंदरात दाखल झाला असून, त्यापैकी पाच कंटेनर कांदा मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत पोहोचला आहे. सध्या सातारा, नाशिक व पुणे येथील विविध भागांतून रोज किमान 100 ट्रक कांद्याची आवक होत असल्याने घाऊक बाजारात कांदा 20 ते 25 रुपये दराने विकला जात आहे; तर दुसरीकडे विदेशातून आलेला कांदा हा वातानुकूलित यंत्रणेत असल्याने त्यात पाणी साठत आहे.

हा कांदा वाळवल्यानंतर त्याचे वजन कमी भरणार असल्याने हा कांदा खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी अनुत्सुकता दर्शवली आहे. तसेच या कांद्यासाठी व्यापाऱ्यांसाठी किमान 25 ते 30 रुपये दर असल्याने त्याचा व्यापाऱ्यांना फटका बसण्याचीही शक्‍यता आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. इजिप्तचा कांदा नवी मुंबईत दाखल InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/egypt-onion-arrives-in-navi-mumbai/feed/ 0 85291
शेतमाल विकून मिळालेल्या 50 हजारांच्या नोटा उंदराने कुरतडल्या https://inshortsmarathi.com/50000-notes-were-crushed-by-mice/ https://inshortsmarathi.com/50000-notes-were-crushed-by-mice/#respond Tue, 22 Oct 2019 09:53:25 +0000 http://inshortsmarathi.com/?p=85279

उंदरांनी कपडे कुरतडल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. मात्र तामिळनाडूमध्ये उंदरांनी नोटा कुरतडल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतमाल विकून आपल्या घरात ठेवलेल्या 50 हजार रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने धान्याची विक्री करून कष्टाने हे पैसे कमवले होते. शेतमाल विकून मिळालेले 50 हजार रुपये […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शेतमाल विकून मिळालेल्या 50 हजारांच्या नोटा उंदराने कुरतडल्या InShorts Marathi.

]]>

उंदरांनी कपडे कुरतडल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. मात्र तामिळनाडूमध्ये उंदरांनी नोटा कुरतडल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतमाल विकून आपल्या घरात ठेवलेल्या 50 हजार रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने धान्याची विक्री करून कष्टाने हे पैसे कमवले होते. शेतमाल विकून मिळालेले 50 हजार रुपये हे आपल्या झोपडीत जमा करून ठेवले होते. पैशांची गरज भासल्यास जेव्हा हा शेतकरी पैसे घेण्यासाठी गेला असता नोटांची अवस्था पाहून त्याला धक्काच बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोईम्बतूर जिल्ह्यातील वेलिंगाडू गावात रंगराज नावाचा शेतकरी राहतो. त्याने आपल्या शेतात पिकवलेले धान्य विकून 50 हजार रुपये जमा केले होते. हे सर्व पैसे रंगराज यांनी आपल्या झोपडीतील एका पिशवीत ठेवले होते. कामासाठी पैसे हवेत म्हणून त्यांनी पिशवी उघडली त्यावेळी शेतमाल विकून मिळालेल्या सर्व नोटा कुरतडल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उंदारांनी पिशवीत ठेवलेले 50 हजार रुपये कुरतडले होते. रंगराज यांच्याकडे 500 आणि 2000 च्या नोटा होत्या.

उंदरांनी कुरडलेल्या नोटा बदलून मिळाव्यात यासाठी रंगराज कुरतडलेल्या नोटा घेऊन बँकेत गेले. मात्र तिथे त्यांची निराशा झाली कारण बँकेने या नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. बँकेतील अधिकाऱ्यांनी कुरतडलेल्या नोटा बदलून मिळू शकणार नाही असे त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. नोटा कुरतडल्यामुळे कुटुंबीय आर्थिक संकटात असल्याचं रंगराज यांनी म्हटलं आहे. उंदराने आपल्या 50 हजार रुपयांच्या नोटा कुरतडल्यामुळे आपल्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असल्याचे रंगराज यांनी सांगितले.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शेतमाल विकून मिळालेल्या 50 हजारांच्या नोटा उंदराने कुरतडल्या InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/50000-notes-were-crushed-by-mice/feed/ 0 85279
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन https://inshortsmarathi.com/appeal-to-keep-farmers-safe-from-harvest/ https://inshortsmarathi.com/appeal-to-keep-farmers-safe-from-harvest/#respond Thu, 17 Oct 2019 06:47:59 +0000 http://inshortsmarathi.com/?p=84542

नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली , कोल्हापूर , सोलापूर ; कोकणातील सिंधुदुर्ग , रत्नागिरी ; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन InShorts Marathi.

]]>

नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली , कोल्हापूर , सोलापूर ; कोकणातील सिंधुदुर्ग , रत्नागिरी ; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात ढगाळी वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात १९ ते २० दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत लोकांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/appeal-to-keep-farmers-safe-from-harvest/feed/ 0 84542
कांदा निर्बंधाविरोधात १५ तारखेला सांगली मार्केट बंद,शेतकरी संघटनेचे आवाहन https://inshortsmarathi.com/sangeet-market-closed-on-15th-against-onion-ban-farmers-union-appeals/ https://inshortsmarathi.com/sangeet-market-closed-on-15th-against-onion-ban-farmers-union-appeals/#respond Fri, 11 Oct 2019 09:32:44 +0000 http://inshortsmarathi.com/?p=83844

देशभरात कांदा दरातील किमंती वाढल्याने दर नियंत्रण करण्यासाठी कांद्यावर निर्बंध लागू केले. सरकारने कांद्याची निर्यात रोखण्यासाठी १९ जूनला १० टक्के निर्यात अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १३ सप्टेंबर २०१९ रोजी ८५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात दर करून निर्यातीला प्रतिबंध निर्माण केला. नंतर ३ सप्टेंबर २०१९ रोजी कांद्याच्या निर्यातीवर थेट बंदी घातली. तरीही सरकारचे समाधान […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कांदा निर्बंधाविरोधात १५ तारखेला सांगली मार्केट बंद,शेतकरी संघटनेचे आवाहन InShorts Marathi.

]]>

देशभरात कांदा दरातील किमंती वाढल्याने दर नियंत्रण करण्यासाठी कांद्यावर निर्बंध लागू केले. सरकारने कांद्याची निर्यात रोखण्यासाठी १९ जूनला १० टक्के निर्यात अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १३ सप्टेंबर २०१९ रोजी ८५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात दर करून निर्यातीला प्रतिबंध निर्माण केला. नंतर ३ सप्टेंबर २०१९ रोजी कांद्याच्या निर्यातीवर थेट बंदी घातली. तरीही सरकारचे समाधान झाले नाही. देशांतर्गत कांदा व्यापारावर साठामर्यादा घातली. घाऊक व्यापाऱ्यांना फक्त ५० टन तर किरकोळ विक्रेत्यांना ५ टन साठा मर्यादा घातली.

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी यांनी कांदा बाजारात सरकारी हस्तक्षेपाचा निषेध करण्यासाठी १५ ऑक्टोबरला कांदा, बटाटा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी बाजारात आणू नये, तसेच व्यापाऱ्यांनीही बंद पाळावा, असे आवाहन शेतकरी संघटना (शरद जोशी) आणि सांगली कांदा बटाटा व्यापारी संघटनेच्या वतीने केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये नुकसान झाले. याच्या निषधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कांदा निर्बंधाविरोधात १५ तारखेला सांगली मार्केट बंद,शेतकरी संघटनेचे आवाहन InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/sangeet-market-closed-on-15th-against-onion-ban-farmers-union-appeals/feed/ 0 83844
भाज्यांचे दर कडाडले https://inshortsmarathi.com/vegetable-prices-increased/ https://inshortsmarathi.com/vegetable-prices-increased/#respond Thu, 10 Oct 2019 09:16:57 +0000 http://inshortsmarathi.com/?p=83690

भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. लांबलेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट आणि आवकही घटल्याने याचा भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. तर सर्वसामान्यांना कांदाही रडवत आहे. गेल्या काही दिवसांत भाज्यांचे भाव कडाडलेत. अधूनमधून सुरू असलेल्या पावसाचा भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर चांगलेच […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाज्यांचे दर कडाडले InShorts Marathi.

]]>

भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. लांबलेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट आणि आवकही घटल्याने याचा भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. तर सर्वसामान्यांना कांदाही रडवत आहे. गेल्या काही दिवसांत भाज्यांचे भाव कडाडलेत. अधूनमधून सुरू असलेल्या पावसाचा भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर चांगलेच वाढलेत.

भाज्याची आवक ३० ते ४० टक्के कमी झाली आहे. त्यामुळे भाज्या कडाडल्या आहेत. तर कांदा सध्या ग्राहकांना राडवत आगे. पावसामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आणि आता त्याला भावही मिळत नाही. नुकतंच शेतकऱ्यांनीही आंदोलन केल्यामुळे मुंबईत कांदा महाग झाला आहे. परवापर्यंत ३० ते ३५ रुपयांनी घाऊक बाजारात विक्रीसाठी आलेला कांदा आज ४० ते ४५ रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना हाच कांदा ५० ते ५५ रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाज्यांचे दर कडाडले InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/vegetable-prices-increased/feed/ 0 83690