InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

Agriculture

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे शेतकरी आत्महत्या

कर्जबाजारी आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. भास्कर राजणकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोक नगर येथील ही घटना आहे.यावर्षी कशीबशी आर्थिक तडजोड करून पाच एकर शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतातलं पीक करपलं. हा…
Read More...

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होणार

देशभरातील काही भागांमध्ये मान्सून जोरदार हजेरी लावत आहे. पण मराठवाडा आणि विदर्भाकडे मात्र वरुण राजाने पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. मात्र आता हवामानात होत असलेल्या बदलामुळे शुक्रवार,19 जुलैपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होणार असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.…
Read More...

नागरी सहकारी बँकांच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ

नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजनेस 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 मार्च 2018 अखेर जी कर्जखाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित किंवा बुडीत वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील अशा सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू होईल. राज्यातील नागरी सहकारी बँकांना अनुत्पादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी…
Read More...

बीडमध्ये शेतकऱ्यावर दुष्कळाचे सावट

पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी बीडमध्ये पावसाचे आगमन झाले नाही. यामुळे मोठया आशेने शेतकऱ्याने लावलेल्या कपाशी माना टाकू लागल्या आहेत. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही , चारा छावण्या बंद , पाऊस नसल्याने नवा चारा नाही अशा परिस्थितीत पशुधन कसे जगवावे , याही वर्षात शेतीत काही पिकले नाही तर काय खावे ? कसे…
Read More...

- Advertisement -

राज्यात येत्या पाच दिवस मान्सून हुलकावणी देणार

येत्या पाच दिवस पाऊस हुलकावणी देणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पुरेशा पावसाअभावी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सुरुवातीच्या पावसाने सुखावलेल्या बळीराजाच्या चरणी पुन्हा चिंता पडणार आहे. राज्यातील पुढचे पाच दिवस हे कोरडेच असणार आहे. मान्सूनचा अक्ष बदलल्याने उत्तर भारत, ईशान्य भारतात…
Read More...

शेतकऱ्यावर दुष्कळाचे सावट; वातावरणात ढग पाऊस मात्र गायब

यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरण्या रखडल्या आहेत. येत्या १७ तारखेपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार असल्याची हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक…
Read More...

शेतकऱ्यांसाठी राज्यभर रस्त्यावर आंदोलन करणार- अजित नवले

मोदी सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रमुख पिकांच्या किमान आधार भावात अत्यंत केविलवाणी वाढ करून शेतक-यांच्या जखमांवर पुन्हा एकदा मीठ चोळले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रमुख पिकांना दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र निवडणुका संपताच मोदी सरकारने शेतक-यांना आपला खरा चेहरा दाखवत…
Read More...

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबलेले शेतकरी ऐन पावसाळ्यातही आत्महत्या करत आहेत. गेल्या १४ दिवसांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र मराठवाड्यात थांबण्यास तयार नाही. १६ ते ३० जून या कालावधीत मराठवाड्यातील ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या दोन आठवड्यात सर्वाधिक नऊ…
Read More...

- Advertisement -

पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू, मुलाला साहेब करण्याचं स्वप्न अधुरं 

उस्मानाबादेत जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा येथील रामेश्वर मनोहर शेळके या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शनिवारी  पेरणी सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. त्यामध्ये बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रामेश्वर शेळके हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी शेतीसोबतच ते मजुरीचे कामही करतात. दोन दिवस पावसाने हजेरी…
Read More...

लातुरात पेरणीला सुरुवात

लातूर - राज्यात मन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. लातूर, अहमदपूर, चाकूर, उदगीर, अहमदपूर या भागात शेतकरी पेरण्या करू लागल्या आहेत. एकूण क्षेत्रफळापैकी फक्त ०२ टक्के पेरण्या अद्याप झाल्या आहेत. त्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली असून लातूर जिल्ह्यातील शेतकरी…
Read More...