InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Agriculture

जलयुक्त शिवार अभियानातंर्गत १३५ कोटींची कामे होणार

टीम महाराष्ट्र देशा -  जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्हयातील 206 गावांमध्ये 135 कोटी रुपये खर्चाची 6358 कामे होणार आहे. या कामांच्या आराखड्यास आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने दिली मंजूरी दिली आहे. मंजूरी दिलेल्या कामांबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करुन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याची वाटचाल निश्चितपणे दुष्काळमुक्तीकडे होईल, असा आशावाद…
Read More...

बळीराजा चेतना अभियानाचा उस्मानाबाद पॅटर्न राज्यभर राबविणार – दिवाकर रावते

उस्मानाबाद: जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला असून या अभियानांतर्गत शेतकऱ्यासाठी काय केले याचा उस्मानाबाद पॅटर्न निर्माण होणार असून हा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबविण्यासाठी विचार केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पालकमंत्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा चेतना अभियान व विविध कामांचा आढावा घेण्यात आला. त्‍यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री रावते म्हणाले की, बळीराजा चेतना अभियानासाठी उस्मानाबाद…
Read More...

चालू वीज बिल भरा कनेक्शन सुरु होईल -चंद्रशेखर बावनकुळे

 टीम महाराष्ट्र देशा - ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे बील थकीत आहे त्यांनी चालू थकित बिल भरून आपले विद्युत कनेक्शन चालू करून घ्यावे व उर्वरित थकित बिलाचे हप्ते पाडून ते अदा करावेत, अशी शेतकऱ्यांना दिलासादायक योजना राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सोमवारी दुपारी पत्रपरिषेदत जाहीर केली.शेतकऱ्यांच्या थकित बिलासाठी तयार केलेली मुख्यमंत्री संजीवनी या नावाची ही नवी योजना शेतकऱ्यांसाठी खरोखरीच संजीवनी ठरावी असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.या नव्या योजनेंतर्गत नोव्हेंबर…
Read More...

ऊसाच्या एफआरपीमध्ये 200 रूपयांनी वाढ ?

टीम महाराष्ट्र देशा-  राज्यात ऊस दारावरून राजकारण भलतच तापल आहे. अनेक शेतकरी संघटना ऊसाला चांगला भाव मिळावा याकरता प्रयत्नशील आहेत , शेतकरी संघटना बरोबरच आता  केंद्रीय कृषिमूल्य आयोग देखील शेतकऱ्यांच्या मदतीस धावून आला आहे . राज्याच्या ऊस पट्ट्यात यंदाचा गाळप हंगाम सुरु होणार असतानाच आता एफआरपीमध्ये 200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय.साधारणत: बाजारपेठेतील…
Read More...

४३४ शेतकऱ्यांना १७ कोटी अनुदानाचे वाटप

जळगाव-:  एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत संरक्षित शेतीसाठी जिल्ह्यातील ४३४ शेतकऱ्यांना १७ कोटी २७ लाख १५ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सामुहिक शेततळयांसाठी २८७ शेतकऱ्यांना ६ कोटी 63 लाख ६१ हजार रुपये, शेडनेटसाठी ५७ शेतकऱ्यांना २ कोटी ५८ लाख ३७ हजार रुपये तर हरितगृह (पॉलीहाऊस) साठी ९० शेतकऱ्यांना ८ कोटी ५ लाख १७ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची…
Read More...

शेतकरी आक्रोश समितीतर्फे २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप

पुणे  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतक-यांचा झालेला अपमान व कर्जमुक्ती प्रकरणी होत असलेली टाळाटाळ, शेतीमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या इतर मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी आक्रोश समितीतर्फे २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप करण्यात येणार, अशी माहिती समितीचे सदस्य शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Read More...

शेतक-यांना ३० टक्के बोनस द्या;शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर-पावसाचा लहरीपणा, दुबार पेरणी, परतीच्या पावसाने पिकांची झालेली नासधूस आदींमुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्यांना30 टक्के बोनस तसेच अंशत: कर्जमाफीऐवजी संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशा मागणीचे निवेदन २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले. राज्यात जाहीर झालेल्या कर्जमाफीनंतर शेतकरी संघटनांनी नव्याने सादर केलेल्या या निवेदनात नमूद केल्यानुसार खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावासाने दडी मारली.शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसाने जेमतेम…
Read More...

२ नोव्हेंबर पासून शेतकरी पुन्हा संपावर

मागील काही दिवसापूर्वी विविध मागण्यासाठी शेतकरी संपावर गेले होते. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी, या बरोबरच हमी भाव मिळावा इत्यादी मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आले परंतु अजूनपर्यंत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नसल्यामुळे  सरकारच्या कारभारावर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर अद्यापही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत…
Read More...

उजनी धरणातील ६५ टीएमसी पाणी गेले वाहून

सोलापूर- परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे १०० टक्के भरलेल्या उजनी धरणातून जादा झालेले ६५ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. ते पाणी पुढे कर्नाटकात गेले. विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये यातील ६० टक्के पाणी वाहून गेलेे.दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर रोजी धरणाचे दरवाजे बंद करण्यात येतात, मात्र यंदा ऑक्टोबर संपत आला तरी धरणा परिसरातून विसर्ग सुरू असल्याने धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात सरासरी १०७ टक्के पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे ऑगस्टमध्येच…
Read More...

महाराष्ट्रातील कापूस गुजरातकडे जाण्याची चिन्हे.

औरंगाबाद,- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी कापसाला प्रतिक्विंटल 500 रुपये अधिक भाव देण्याचे जाहीर केल्याने राज्यात फडणवीस सरकारसमोर नवा पेच निर्माण होणार आहे. या वर्षी कापसाचा किमान हमी भाव 4320 रुपये आहे. राज्यात 85 लाख क्विंटल गाठी कापूस उत्पादित होईल. यातील बहुतांश कापूस गुजरातला विक्रीसाठी जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे उर्वरित कापूस खरेदीचा दर येत्या काळात राज्य सरकारसमोरची डोकेदुखी असू शकेल. बुधवारपासून राज्य कापूस महासंघ 60 खरेदी केंद्र सुऊश् करणार आहे. केंद्र सरकारच्या…
Read More...